• bg-two
  • bg-two

सुवर्ण संधी

आपले समाज मंडळ Online बनवुन, आपल्या मंडळाला द्या नविन ओळख !
आपल्या मंडळाचा इतिहास, मंडळाची सध्याची कार्यकारी मंडळी, मंडळाची वाटचाल, समाज भवनाची Online बुकिंग, सभासदांची नोंदणी, माहिती, कुटूंब संख्या , विवाह नोंदणी आणि वधू-वर मेळाव्यांसाठी Payment Gateway, मंडळाचा जमा-खर्च,अहवाल आणि ऑडिट, SMS आणि Email सेवा असं बरेच काही आपल्या सेवेत उपलब्द करून देत आहे.
www.ahirsonarhub.com

सुवर्ण संधी

लवकरच Mobile app आपल्या सेवेत दाखल होणार.
अधिक माहितीसाठी Call Us : Ahir Sonar Hub (+91 8308005483)


अध्यक्ष:श्री.धनराज विसपुते (नवी मुंबई सुवर्णकार विकास मंडळ)

अध्यक्ष:श्री.धनराज विसपुते
ठाणे

'श्री संत नरहरी महाराज नम:' नाम स्मरण,नवी मुंबई विकास मंडळ, कार्य कार्यकारणीच्या वतीने समस्त सोनार बंधू-भगिनींचे सहर्ष अभिवादन तसेच "अहिर सोनार हब" टीम च्या अष्टपैलूंचे मनापासून आभार.

सध्याच्या डिजिटल युगात पालकांची आणि त्यांच्या पाल्यांची विवाह जुळणी करिता होणारी धावपळ लक्षात घेता, आपण "Mobile App" आणि www.ahirsonarhub.com ह्या संकेत स्थळा निमित्त नवीन उपक्रम आपल्या सेवेत उपलब्ध करून देत आहोत. ह्या उपक्रमामुळे परिणामी आपल्या अमुल्य वेळेची आणि पैशांची बचत होणे शक्य होणार आहे. तसेच आपला विचार एका शहरासाठीच मर्यादित नसून इतर लहान-मोठया शहरातील वधु-वरांची माहिती प्रसारण करण्याचा आहे. नवी मुंबई विकास मंडळ आणि अहिर सोनार हब परिवारा तर्फे आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद....!

माजी अध्यक्ष:श्री.अनिल सुराजीवाले (दंडगव्हाळ )

माजी अध्यक्ष:श्री.अनिल सुराजीवाले (दंडगव्हाळ )
ठाणे

अहिर सुवर्णकार समाज ठाणे कार्य कार्यकारणीच्या वतीने समस्त सोनार बंधू-भगिनींचे सहर्ष अभिवादन तसेच "अहिर सोनार हब" टीम च्या अष्टपैलूंचे मनापासून आभार कारण आज आम्ही घर बसल्या ग्लोबल स्तरावर सामाजिक विचार विनिमय करू शकतो.

आपला समाज अखिल सोनार एकत्र येऊन अडी अडचणींच्या वेळेस समाजाच्या लोकांकडून योग्य मार्गदर्शन मिळून नवीन नाती संबंध जुळू शकतात . ज्याप्रमाणे आपण आपलं कुटुंब वाढवितो त्याचप्रमाणे आपला समाज वाढविण्याची जबाबदारी आपलीच असते ; हे सर्व कार्य वेबसाईट सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सोपे झाले आहे, तरी सर्व समाज ज्ञातींना नम्र विनंती की त्यांनी एकाच छत्राखाली येऊन या वेबसाईट चा लाभ घ्यावा

अध्यक्ष:श्री.नंदकुमारजी दत्तात्रेयशेठ वडनेरे

अध्यक्ष: श्री.नंदकुमारजी दत्तात्रेयशेठ वडनेरे
पुणे

महाराष्ट्रातील अथवा महाराष्ट्राच्या बाहेरील समाज बांधवांसाठी, मंडळांसाठी गौरवाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे “अहिर सुवर्णकार समाज, पुणे” मंडळा प्रमाणे, आपले ही मंडळ एकही रुपया खर्च न करता Online होऊ शकते आणि आपल्या समाज मंडळाची वाटचाल आणि महती जगभर प्रसिध्द करता येऊ शकते. “अहिर सुवर्णकार समाज, पुणे” मंडळाने आपल्यापुढे एक आदर्श ठेवला आहे. त्यांचे अनुकरण करून आपणही ह्या संधीचा आवश्य लाभ घ्यावा आणि दुसऱ्या समाजांसाठी ही आदर्श निर्माण करावा. आमचा उद्देश आणि ध्येय सुवर्णकार समाज जोडण्याचा आणि आधुनिकीकरणाचा आहे. आपणच ह्यात सहाय्य करू शकतात. ही बातमी आपल्या शहारातील कार्यकारणी मंडळातील वरिष्ठ लोकांपर्यंत पोहचवावी एवढीच एक माफक विनंती आपणास करू इच्छितो........ देवा तुजा मी सोनार, धन्यवाद.

|| सुवर्ण विचार ||

सोनारी युटोपीया

कै.श्री.सुरेशजी पिंगळे (काका)
पुणे

जातीची बंधिलकी

आज तरुण पिढीला जातिबद्दल बंधिलकी ऊरली नाही हे व्यासपीठावरून टाळ्या घ्यायचे वाक्य झालेले आहे पण हे का झाले आहे याचा विचार मात्र होत नाही. प्रत्येकाच्या मनात जातीला थोडीफार का होईना जागा मिळायला हवी. "ह्या आधुनिक विशाल जगात वावरताना मी जातीत नसलो तरीही मी जातीचाच असतो" ही वैयक्तिक जाणीव प्रत्येकाने ठेवली तरी पुरे होईल. "मी आहे म्हणून जात नाही तर जात आहे म्हणून मी आहे" हे सत्य स्वीकारले गेले पाहिजे.